मुंबई बँक अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी): विधानपरिषद माजी विरोधी पक्षनेता तथा मुंबई बँक अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांची कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली.निकटच्या कार्यकर्त्यांच्या लग्नानिमित्त आलेले दरेकर कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर आले होते. त्यावेळी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ देत दरेकर यांचे स्वागत केले. यावेळी शेतकरी खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत, नगरसेविका मेघा गांगण, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधिये, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, विजय चिंदरकर, मिलिंद चिंदरकर, पपू पुजारे, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सुभाष मालंडकर, सदा चव्हाण, शाम दळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!