शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा

राष्ट्रवादी अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार – शरद पवार

ब्युरो न्यूज: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले गेले असल्याचे म्हटले जात आहे. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी या पुस्तकात भाष्य केल्याचे बोलले जात आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवारांकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असे शरद पवार म्हणाले. आता राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष कोण ? पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी नेमकं कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!