कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग, कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन निमित्त खास रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे यांचे दुसरे वर्ष होते. यांचे उदघाट्न कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वतः मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी रक्तदान करून कार्यक्रमाला सुरवात केली. यावेळी नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, मेघा गांगण, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे कणकवली तालुकाध्यक्ष मकरंद सावंत, सदस्य विनायक पारधीये, कनकसिंधु शहर स्तर संघाच्या अध्यक्ष प्रिया सरूडकर, रंजिता परब, शुभांगी उबाळे, दिव्या साळगावकर, स्वाती राणे, स्वाती गोखले, सुचिता पालव, ईशा कांबळे, विशाखा कांबळे, मयूरी सरंगले, ज्योती रावराणे, निलम कोरगावकर, CLF व्यवस्थापक सिद्धी नलावडे, कणकवली नगरपंचायत सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, जिल्हा रक्तपेढीचे सर्व कर्मचारी, रक्तदाते व बचत गट महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले कि, रक्तदान हे श्रेष्ठ दान असून जागतिक महिलादिनी रक्तदान शिबीर आयोजित करणे हा स्तुत्य उपक्रम असून यातून एकावेळी आपण तीन व्यक्तीचे प्राण वाचवत असतो. तसेच अनेक वेळा रक्ताची गरज असते पण रक्त किंवा रक्तदाते सापडत नाही. त्यावेळी अश्या पद्धतीने रक्तदान शिबीर आयोजित केल्याचा फायदा हा सर्वाना होतो. इतर कार्यक्रम यशस्वी करणे सोपं असत पण रक्तदान कार्यक्रम यशस्वी करणे हे कठीण गोष्ट असते. त्यामुळे अश्या प्रकारचा सामाजिक उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व महिलांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वतः रक्तदान करत रक्तदानाचे महत्व किती आहे हे कृतीतून दाखवून दिल. हे त्याचे पाचवे रक्तदान होते. महिलांनी रक्तदान कारणे हे त्या स्वतः सुदृढ असल्याचे लक्षण असून जास्तीत जास्त महिलांनी रक्तदान करणे आवश्यक असून ज्या महिला या साठी पात्र होणार नाहीत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत पुढील काळात रक्तदाते होण्यासाठी प्रयत्न करावा व या रक्तदानच्या चळवळीत आपणही एक महत्वाचा घटक बनावा असे त्या म्हणाल्या व कार्यक्रम आयोजनासाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या. नगरसेविका मेघा गांगण यांनीही यावेळी रक्तदान करत जास्तीत महिला व इतर रक्तदाते यांनी रक्तदान करावे असे आवाहन केले. हे त्यांचे एकोणिसावे रक्तदान होते.
या शिबिरात एकूण 30 रक्तदाते यांनी रक्तदान केले. 18 पुरुष रक्तदाते यांनी रकदान करत जगातीक महिला दिनाच्या सर्व महिलांना अनोख्या शुभेच्छा देत अभिवादन केल तर 12 महिला रक्तदात्यानी रक्तदान केल. यामध्ये तृप्ती दळवी व संपदा तेली यांचे हे पहिलेच रक्तदान होते. तसेच गौरी पाटील , मेघा गांगण, रंजिता परब, स्वाती गोखले, प्रज्ञा खुडकर, पूजा माणगावकर,प्रणाली चव्हाण, वृषाली आरोंदेकर, शहजीन शेख, प्राची चव्हाण यांनीही जागतिक महिला दिन निमित्त रक्तदान करत समाजातील प्रत्येकाने रक्तदान करावे. हा सामाजिक संदेश दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवलीच्या सर्व कार्यकारणीने विशेष परिश्रम घेतले.












