नगरसेविका मेघा गांगण यांनी केले रक्तदान

पुरुषांसोबत महिलांनीही रक्तदानाच्या अनमोल कार्यात सहभागी होण्याचा दिला संदेश

कणकवली (प्रतिनिधी) : दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कनकसिंधू शहर स्तर संघयांनी महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर मध्ये रक्तदान करण्याचा योग आला. जिल्हा आरोग्य प्रशासनाला अपघात ग्रस्त जखमी व्यक्ती, गरोदर माता तसेच दुर्धर आजार यावर उपचार करताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. रक्ताची कमतरता रुग्णाला भासू नये यासाठी विविध भागांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम घेतला जातो. आणि त्यामध्ये जर महिलांनी पुढाकार घेतला तर ती गौरवस्पद गोष्ट असते. कणकवली शहरातील महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत असताना अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवतात याचा सार्थ अभिमान वाटतो. यावेळी कनकसिंधू शहर स्तर संघ च्या अध्यक्षा प्रिया सरूडकर, आस्मा बागवान,पुजा माणगांवकर, प्रणाली चव्हाण, तृप्ती सावंत, स्वाती राणे, दीपा पेडणेकर, स्वाती गोखले, सुषमा पोटफोडे, शुभांगी उबाळे, पुर्वा सुतार, रंजिता परब, सुचिता पालव, इशा कांबळे, विशाखा कांबळे, दिव्या साळगांवकर, सुप्रिया सरंगले इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!