गितांजली घागरे ठरल्या ‘स्मार्ट सुनबाई’

सन्मान, प्रेरणा अन् कौतुक भरल्या वातावरणात चिंदर तेरई येथे महिला दिन उत्साहात साजरा

आचरा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंदर तेरईवाडी जि. प. शाळा, अंगणवाडी शाळा पटांगणावर चिंदर तेरई व तेरई तरूण सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन सोमवार १६ मार्च रोजी सन्मान, प्रेरणा अन् कौतुक भरल्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिणी घागरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात विविध स्पर्धात्मक आणि मनोरंजनात्मक खेळांनी रंगत आणली होती. या मध्ये स्मार्ट सुनबाई खेळात गितांजली घागरे यांनी बाजी मारली. त्यांना पैठणी साडी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध खेळांचेतील विजेत्यांनाही बक्षिसे वितरित करण्यात आली. विजेत्यांना उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या वतीने बक्षिसे, भेटवस्तू तर उपस्थितांना व कार्यक्रमात सहभागीना निसर्गाचे महत्त्व पटावे, या हेतूने ग्रामपंचायत सदस्य केदार परूळेकर यांच्याकडून सुपारी रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच भाग्यश्री घागरे, ग्रामपंचायत सदस्य रिया घागरे, पोलिस पाटील सोनाली माळगांवकर, रोहिणी घागरे, अंगणवाडी सेविका प्रतिभा मेस्त्री, मदतनीस स्नेहल पवार, तेरई तरुण सेवा मंडळ अध्यक्ष गजानन घागरे, सेक्रेटरी अमित घागरे, सचिन घागरे, तेरई शाळा मुख्याध्यापक कैलास काळे, अमित घागरे, योजना माळगांवकर, रोहिणी केळसकर, लतिका घागरे आदी महिला वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!