तरंदळेत १४ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव

भव्य जिल्हास्तरीय वैयक्तिक खुले रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गावशाखा आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दि १४ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.संयुक्त जयंती महोत्सवा निम्मित १४ मे रोजी भव्य जिल्हास्तरीय वैयक्तिक खुले रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा लहान गट (१३ वर्षा खालील) व खुला गट अश्या दोन गटात होणार असून खुलागटा साठी प्रत्येकी २००/- एवढी प्रवेश फी आहे तर बक्षिसाच स्वरूप प्रथम,द्वितीय,तृतीय,उत्तेजनार्थ दोन बक्षिसे आणि चषक असे स्वरूप आहे. तर लहान गटासाठी १००/- एवढी प्रवेश फी असून प्रथम,द्वितीय,तृतीय,उत्तेजनार्थ दोन बक्षिसे आणि चषक असे बक्षीसाचे स्वरूप आहे. तसेच लहान गटातील स्पर्धकांना आधारकार्ड अनिवार्य आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी आवश्यक आहे.स्पर्धेत सहभागी होण्याकरिता संपर्क सुशील कदम: 8275603901,9763685553, वनिता कदम:9405749244, विशाल कदम:9021039122, राहुल कदम:7972691180, प्रशांत कदम:9405749252 जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन गावशाखा – आदर्श बौद्ध विकास मंडळ – तरंदळे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!