वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क हवा

आरवली सखैलेखोल येथील शैलेश गोडकर यांचे जि.प.कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क मिळावा आणि या जमिनीमध्ये अनधिकृतरीत्या करण्यात आलेले बांधकाम तोडण्यात यावे या मागणीसाठी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सखैलेखोल येथील शैलेश अर्जुन गोडकर याने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सखैलेखोल येथे आपली वडिलोपार्जित जमीन आहे. मात्र आपल्या वडिलांच्या मृत्यू नंतर या जमिनीतील नावे आपले काका यांच्या सांगण्यावरून संबधित तलाठी यांनी परस्पर रित्या संगनमताने कमी केली आहे. तसेच या जमिनीतील काही भाग विक्रीही केला असल्याचे शैलेश गोडकर यांनी सांगितले. दरम्यान या वडिलोपार्जित जमीन मध्ये आपल्याला हक्क मिळावा यासाठी आपली आई अंजनी गोडकर आणि आपण स्वतः गेली १५ वर्षे पाठपुरावा करत आहोत.मात्र आपल्या मागणीची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. शिवाय जमीन विक्री केलेल्या जागेत बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र यावरही काही होत नाही. त्यामुळे आपल्याला नाईलाजास्तव आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क मिळावा आणि या जमिनीमध्ये अनधिकृतरीत्या करण्यात आलेले बांधकाम तोडण्यात यावे तसेच प्रकरणी दोषी अधिकारी यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर करवाई व्हावी. या मागणीसाठी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण करावे लागत असल्याची माहिती शैलेश गोडकर यांनी दिली.तसेच या प्रकरणी सर्व वारसांची एकत्रित सुनावणी घेऊन आपल्याला योग्य न्याय द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे निवेदना द्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!