देवधर प्रकल्पात बाधित झालेल्या कुर्ली बौद्धवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन करा

कुर्लीतील ग्रामस्थांचे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुर्ली बौद्धवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी क़ुर्ली ग्रामस्थानी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होतअसलेल्या कुर्ली बौद्ध वस्तीतील सर्वच कुटुंबांचे पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनपुनर्वसनाची मागणी केलेली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर ग्रामस्थांचे खास बाब म्हणून पुनर्वसन प्रस्ताव सादर करावा असे आदेशित केले होते.त्यानुसार सप्टेंबर २०११ मध्ये अधिक्षक अभियंता यांनी मा. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांना दोन प्रतीतप्रस्ताव सादर केला होता. मात्र सदर प्रस्तावाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसनाबाबतअद्यापही निर्णय होवू शकला नाही. सरकारच्या या उदासिन धोरणाच्या विरोधात आणि पुनर्वसनाचानिर्णय तातडीने करावा या मागणीसाठी क़ुर्ली बौद्धवाडी धरणग्रस्थ ग्रामस्थानी आज ( ३ मे) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

सन २०११ मध्ये सादर करण्यात आलेला सुधारीत प्रस्तावाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला तरी पुनर्वसनाचा कोणताही निर्णय करण्यात आला नाही. अथवा कोणतीही कार्यवाही झालेली नाही. धरणाच्या बुडीत क्षेत्रात सदर वस्तीची सर्व शेतजमीन गेली आहे. इतकेच नव्हे तर वस्तीही बाधित होत आहे. धरणग्रस्तांचे नेते मा. डॉ. भारत पाटणकर यांनी मा. जिल्हाधिकारी यांचेसोबत झालेल्या बैठकीत कुर्ली बौद्ध वस्तीची पुनर्वसनाची मागणी न्याय्य असल्याचे सांगून पुनर्वसन होईपर्यंत धरणात पूर्ण
क्षमतेने पाणीसाठा करण्यात येवू नये. असा निर्णय करण्यात आला. त्यानंतर मा.जिल्हाधिकारी यांनी वस्तीला भेट देवून वस्तुस्थितीची खातरजमा करून पुनर्वसन होईपर्यंत धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नकरण्याचे धोरण राबविले जात आहे.
मात्र तरीही सदर वस्तीच्या पुनर्वसनाचा निर्णय करण्यास का टाळले जात आहे?.असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी कुर्ली बौद्धवस्तीच्या पुनर्वसनाचा निर्णय करून तातडीने पुनर्वसन करावे या मागणीसाठीकुर्ली बौद्धवाडी धरणग्रस्त ग्रामस्थानी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये संपत देसाई, अंकुश कदम, रमेश सकपाळ यांच्यासह मोठ्या संखेने महिला -पुरुष ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!