श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे 15 रोजी स्वामी पुण्यतिथी उत्सवचे आयोजन

पोईप (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरू भक्त सेवा ‌न्यास, संलग्न रजि. श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट
ता. मालवण या मठामध्ये बुधवार दि. १५ एप्रिल २०२६ रोजी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी साजरी होत आहे

यानिमित्त या मठामध्ये खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविक, भक्तांनी उपस्थित राहून दर्शन, तीर्थ-प्रसाद आणि अन्नदान-महाप्रसाद लाभ घ्यावा.
अशी विनंती मठाच्या वतीने करण्यात आली आहे

कार्यक्रम पुढीलप्रमाणे
सकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्तीवरती आणि
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज चरण पादुकांन वरती दुग्ध आणि जलाभिषेक,
सकाळी ८ वा. श्री स्वामी समर्थ महाराज यांची षोडशोपचार पूजा अर्चा,
सकाळी ८:३० वा. होम हवन, आरती
सकाळी १०:३० वा. पालखी सोहळा
दुपारी १२:३० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण
दुपारी १ वा. – अन्नदान-महाप्रसाद
सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती
सायंकाळी ७:३० वा. श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ – पोईप, मालवण यांचे सुस्वर भजन बुवा ओंकार येरम. असे कार्यक्रम होणार आहेत.

error: Content is protected !!