आपला सिंधुदुर्ग न्यूज वर्धापनदिन सोहळ्यात विजेत्यांना केले जाणार सन्मानित
काशिनाथ वर्देकर, नयना गुरव,समीर वेंगुर्लेकर, श्रेयश शिंदे, नागेश कदम,सिद्धी परब,मनिषा पाटील,विजय सुतार यांचा होणार सन्मान
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : तळकोकणचा बुलंद आवाज बनलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चा पाचवा वर्धापनदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा शनिवार 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 :30 वाजता कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. यानिमित्त आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या अद्वैत दिवाळी अंक आयोजित राज्यस्तरीय आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा आणि काव्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे. राज्यभरात आपली नाममुद्रा उमटवलेल्या अद्वैत दिवाळी अंक आयोजित कथा काव्य स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला होता. राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितेचा पुरस्कार काशिनाथ वर्देकर यांना मिळाला असून राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितेचा पुरस्कार नयना गुरव यांना जाहीर झाला आहे. तसेच सिंधुदुर्ग – रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेते समीर वेंगुर्लेकर, द्वितीय क्रमांक विजेते श्रेयश शिंदे, तृतीय क्रमांक विजेते नागेश कदम ठरले आहेत. सिंधुदुर्ग -रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय काव्यस्पर्धेचे प्रथम क्रमांक विजेत्या सिद्धी परब, द्वितीय क्रमांक विजेत्या मनिषा पाटील, तृतीय क्रमांक विजेते विजय सुतार आहेत. सर्व विजेत्या साहित्यिक स्पर्धकांना मान्यवर विशेष अतिथींच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.












