यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, संस्कृतिक कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगीवे व वारगाव या दोन गावांना जोडणारी घाटात वसलेली श्री देवी आदिष्टी माता या देवीच्यानव्याने बांधण्यात आलेल्या सुंदर मंदीराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रम बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ ते शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ या कालावधीत साजरा होणार असून यानिमित्ताने विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री आदिष्टी माता उत्सव समिती, वारगाव विकास मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थ वारगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे घाटीत वारगाव येथील श्री देवी आदिष्टीचे मंदिर महामार्गाच्या कामात विस्थापितहा झाले होते. मात्र स्थानिक ग्रामस्थ मदतीने व महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने नव्याने बांधण्यात आलेले हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून महार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक वाहनचालक येथे थोडा वेळ थांबून देवीला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. हे या देवीचे आजपर्यंतचे वैशिष्ट्य जपले गेले आहे.
श्री आदिष्टी माता मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २२/४/२०२६ रोजी स. ८.३० वा. ग्रामदेवतादी सर्व देवताना नारळ, विडा, अर्पण प्रतिष्ठेचा संकल्प, पुण्याहवाचन, मातृक पूजन, नांदी श्राद्ध, आचार्यदी सर्व ब्राह्मणाचे पूजन, प्रकार शुद्धी, जलाधिवास, कलशाची शुद्धी, निद्रावास दु. २ ते ३ महाप्रसाद, सायं. ६ ते रात्री १० स्थानिक भजने, गुरुवार दि.२३/४/२०२६ रोजी स.७.३० वा. वस्तुग्रह व देवतांची स्थापना पूजन, हवन,मुख्य देवतेच्या प्रित्यर्थ हवन, स.८.३० वा. ह. भ. प. भक्ती योगी कृष्णानंद महाराज श्रीकृष्णानंदाश्रम श्रीक्षेत्र गोपाळपूर,खांबाळा ठाणे( मुळगाव खांबाळा,वैभववाडी) यांच्या हस्ते केलशाची स्थापना,वास्तू होम,ग्रह होम दु.१.३० वा. निद्रावास,दु.२.०० वा. महाप्रसाद, रात्री ८ ते ९ श्री विठ्ठल रखुमाई महीला पथक वारगाव यांची दिंडी शुक्रवार दि. २४/४/२०२६ रोजी स. ८ वा. स्थापित देवतांची पूजा, तत्व होम स. १० वा. देवतांची प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा महापूजा, बलिदान, पूर्णाहुती,अभिषेक,महानेवैद्य समर्पण, आरती, प्रार्थना, प्रसाद उस्तर्ग, सर्व कर्म ईश्वराला अर्पण, दु. १ वा. महाप्रसाद, सायं. ७ ते ९ महिलांसाठी विशेष कार्यक्रम “होम मिनिस्टर”- खेळ पैठणीचा तर रात्री १०. वा. डबलबारी भजनांचा जंगी सामना शिवणे गुहागर येथील बुवा संतोष मेस्त्री व भांडुप येथील बुवा सुशील गोठणकर या दोघांमध्ये होणार असून सर्व नगरिकानी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री आदिष्टी माता उत्सव समिती, वारगाव विकास मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थ वारगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.












