हातेरी नदी गाळ काढणीसह विकास कामांचा शुभारंभ
कुडाळ (प्रतिनिधी) : पणदूर-वेताळ बांबर्डे हातेरी नदीतील गाळ काढणे, डिगस राणेवाडी रस्ता खडीकरणं डांबरीकरणं करणे तसेच डिगस राणेवाडी 100 kv ट्रान्सफॉर्मर बसवणे ई.कामाचा शुभारंभ आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पावशी जिल्हा परिषद विभागात अनेक विकास कामे मंजूर आहेत. या विकास कामांचा उद्घाटन सोहळा आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पावशी जि.प. सदस्य दादा साईल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा आंब्रड जि.प. सदस्य दिपलक्ष्मी पडते, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, माजी जि.प. अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, तालुकाप्रमुख तथा घावनळे जि.प.सदस्य दीपक नारकर, वेताळ बांबर्डे जि.प. सदस्य नागेश आईर, शिवसेना उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर, पं.स सदस्य निखिल कांदळगावकर या आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थिती होते.
गेली अनेक वर्षे कर्ली नदी आणि तिच्या उपनद्या हातेरी, भंगसाळ, पिटढवळ या नद्यांमुळे पावशी, पणदूर, वेताळ बांबर्डे, बाव, बांबूळी, सोनवडे, सरंबळ, कवठी इ. गावांना पुराच्या पाण्यामुळे वारंवार त्रास सहन करावा लागत होता. मोठ्या प्रमाणात शेती आणि लोकवस्तीत पुराचे पाणी घुसून अतोनात नुकसान आणि त्रास शेतकरी आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. मान. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने कर्ली नदी आणि तिच्या उपनद्यांमधील गाळ काढण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते.
या अनुषंगाने जलसंपदा विभाग तसेच नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणदूर, वेताळ बांबर्डे येथे हातेरी नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ आज पणदूर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी कार्यकारी अभियंता श्रीमंगले, पणदूर सरपंच पल्लवी पणदूरकर, पोलीस पाटील देऊ सावंत, सत्यवान साईल, उदय सावंत, ग्रा.प. सदस्य आबा सावंत, माजी सरपंच बबन पणदूरकर, विनायक आणावकर, साजुराम नाईक, महेश परब, विनायक साईल, किरण मोरे, जयदीप तुळसकर, शाखाप्रमुख बबन निर्गुण, दीपक साईल, भगवान साईल, आपा साईल, उमेश साईल, सचिन साईल, पवन पणदूरकर, तन्मय साईल, नितेश साईल, प्रथमेश साईल, कांशीराम साईल, गौरव गोसावी, बाळा गोसावी आदी उपस्थित हाेते.












