रामेश्वर वाचन मंदिर येथे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसाद…..!

आचरा (प्रतिनिधी) : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून रामेश्वर वाचन मंदिर आचरा येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शासकीय अनुदान सन २०२५-२६ दुसऱ्या हफ्त्यातून खरेदी केलेल्या पुस्तकांचे ‘ग्रंथप्रदर्शन’ संस्थेच्या वाचन कक्षात आयोजित केले होते. सदरच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ‘अनामप्रेमी परिवार ‘ या स्वयंसेवी गटाच्या सदस्या संजय देशपांडे (बाजीप्रभू देशपांडें यांचे वंशज)यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी,जि प सदस्या वर्षा सांबारी, सुरेश ठाकूर वाचनालयाचे कार्यकारीणी सदस्य सौ उर्मिला सांबारी, श्रीमती वैशाली सांबारी,कावले, भिकाजी कदम , ग्रंथपाल विनिता कांबळीयांसह सांस्कृतिक समिती सदस्य तसेच वाचनप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

अनामप्रेमी परिवार हा स्वयंसेवी गट मुंबई येथे कार्यरत असून, या संस्थेच्या सौ. हेमा नगरे आपल्या मनोगतात म्हणाल्या,आमचा गट अंध, अपंग, मूकबधिर यांच्यासाठी काम करतो. तसेच आपल्याला जपणारे पोलिस, सैनिक, वाहन चालक, नर्स यांच्यासाठीही काम करतो.संविधानात समाविष्ट असलेली ११ कर्तव्ये जास्तीत जास्त आमच्याकडून पार पडतील असे प्रयत्न आम्ही करतो.

अनामप्रेमी या गटाचे ज्येष्ठ सदस्य श्रीराम कापसे म्हणाले की, आम्ही सर्वचजण वाचनवेडे आहोत. आपण सर्वांनी आम्हाला ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची संधी दिलीत.त्याबद्दल आम्ही खरंच आपले आभारी आहोत. या गटाच्या ज्येष्ठ सदस्या सौ.नूतन देशपांडे म्हणाल्या आमच्या या संस्थेचे सर्व सदस्य वेगवेगळी वाद्ये वाजवून रोगग्रस्त व अंध, अपंगांचे मनोरंजन करतात. आमच्या गटाच्या ३ सदस्यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाचे गुजराती,चिनी आणि इतर एक अशा तीन भाषांत भाषांतर केले आहे. आम्ही सर्वचजण वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न करत आहोत.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाजी भिसळे व उपाध्यक्ष श्री. अशोक कांबळी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे विविध उपक्रम व पुस्तकांचे महत्त्व विशद केले. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. उर्मिला सांबारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सदरच्या ग्रंथप्रदर्शनात कथा, कादंबरी, चरित्र, इतिहास, संदर्भ ग्रंथ, प्रवासवर्णन, धार्मिक, बाल वांङमय इ. प्रकारची पुस्तके, मांडण्यात आली होती. याला वाचनप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!