पोलिस पाटीलांचे जिल्ह्यांत लवकरच प्रशिक्षण आयोजित करू

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी अभाअंनिसला दिले आश्वासन

अभाअंनिसचे जिल्हासंघटक विजय चौकेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी

अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याची ग्वाही

ओरोस (प्रतिनिधी) : राज्यात खरात आणि अन्य भोंदू बाबांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असताना आपल्या जिल्ह्यात भविष्यात खरात निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी आणि जिल्ह्यात प्रभावीपणे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मा . डॉ. मोहन दहिकर साहेब यांची नुकतीच भेट घेतली .

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंबलबजावणी PIMC स्थापन केली असून या समितीने हा कायदा प्रभावीपणे जिल्ह्यात राबवायचा आहे . असे सांगितले .

जिल्ह्यातील गावागावात आणि वाडीवस्तीत एक तरी भोंदू बाबा आणि जादूटोणा करणारे असून याची माहिती त्या त्या गावातील पोलिस पाटील यांना असते. जर आपण जिल्ह्यातील पोलिस पाटील यांचे जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण आयोजित केलात तर त्यांना या कायद्यांचा कलमांचे कोण कोण उल्लंघन करतात याची माहिती समजेल आणि ते आपल्या पर्यंत त्याची सविस्तर माहिती देतील .यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील यांचे प्रथम जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण आयोजित करावे अशी लेखी निवेदनाद्वारे विनंती केली .

तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग यांनी २०१६ सालीच सर्व अधिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना दक्षता अधिकारी म्हणून नियुक्त करावे असे आदेश काढले आहेत . या आदेशाप्रमाणे आपल्या जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष स्थापन करावा व या कक्षामध्ये जिल्ह्यातील अशा भोंदूबाबा व जादूटोणा करणाऱ्यांची माहिती संकलित करावी अशी लेखी मागणी केली .

पोलिस अधीक्षक यांनी प्रथम जिल्ह्यात अभाअंनिस चांगले काम करीत असल्याचे दैनिक वर्तमानपत्रातून वाचायला मिळते . त्या बद्दल आपले कौतुकच आहे . आपण करीत असलेल्या कामासाठी जेथे जेथे पोलिस सहकार्य लागेल तेथे ते सहकार्य आमचे पोलिस आपणास करतीलच . असे आश्वासन दिले .तसेच लवकरच जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील यांचे जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल . या प्रशिक्षणास आपणास बोलविले जाईल .पोलिस पाटील यांच्या मार्फत गावा गावातील भोंदू बावा आणि जादूटोणा करणार्याची माहिती संकलित केली जाईल तसेच जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन केला जाईल .
आपल्या जिल्ह्यात खरात सारखे भोंदू बावा निर्माण होणार नाहीत याची वेळीच उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन विजय चौकेकर यांना भेटी वेळी दिले .

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष ॲड राजीव बिले यांनी दहिकर साहेबांनी दाखविलेल्या सहकार्याबद्द्ल आणि समितीच्या कामकाजाचे केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानले

error: Content is protected !!