पूर परिस्थितीच्या अनुषंगाने योग्य ते निर्णय घ्या

जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद क्रमांक यांना बांदा वाशियानी दिले निवेदन

बांदा (प्रतिनिधी) : नुकतीच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपतीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काfळ व प्रभावी मदत मळावी यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज बांदा ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा आपत्ती अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. बांदा शहर हे बुडीत व पूरप्रवण म्हणून नोंदीत आहे व दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व शेतकरी यांचे अतोनात नुकसान होते. याकरिता यंत्रणा व मदत उभी करण्याची विनंती केली. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरिता शासनाकडून दिलेली फायबर बोट ही वजनाने हलकी असल्याने पुराच्या प्रवाहाच्या वेळी तिचा वापर करता येत नाही. याकरिता लाकडी बोट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे असलेल्या फायबर बोटीला आउटबोर्ड मशीन बसवून मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याची तात्काळ दखल घेत जि प अध्यक्ष प्रमोद कामत यांनी याबाबत संबंधित विभागांना कल्पना देऊन लाकडी बोटीसह आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारे साहित्य पावसाळ्यापूर्वी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, पाटेश्वर युवक मंडळाचे राज हरमलकर, साई मठाचे राकेश केसरकर, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते निलेश नाटेकर, दिलीप बांदेकर,शुभम कवठणकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!