पोक्सो च्या गुन्ह्यात गिरीश नलावडे ला 20 वर्ष सश्रम कारावसासह 50 हजार दंड

सरकारी वकील संदीप राणे, गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग) :  अल्पवयीन युवतीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी गिरीश सदाशिव नलावडें याला जिल्हा न्यायाधीश सानिका जोशी यांनी 20 वर्षे सश्रम कारावासासह 50 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. सन 2019 ते 2021  या कालावधीत आरोपी गिरीश सदाशिव नलावडे  याने  अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये भादवि कलम ३७६,३७६(२)(N),३७६(३),POCSO कायदा कलम ४,६,८,१२ हा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हयाचे तपासकाम महीला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यानी केले होते. खटला विशेष न्यायाधीश सानिका जोशी यांचे न्यायालयात चालला. सरकारतर्फे खटला जिल्हा सरकारी वकील संदीप राणे यानी चालवला. आज शिक्षेच्या मुद्दयावर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यानी युक्तिवाद करुन आरोपीने नैतिकतेच्या विरूध्द व नात्याला काळीमा फासणारा  गंभीर गुन्हा केल्याने त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे व समाजात देखील चांगला संदेश जाणे आवश्यक असल्याची बाजु  मांडली. जिल्हा न्यायाधीश सानिका जोशी यांनी  आरोपी गिरीश नलावडे याला 20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावली.

error: Content is protected !!