राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत लीनांशा नाईक हिचे यश

*दोन सिल्वर व एक ब्राँझ मेडल पटकावले*

*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :* पुणे बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सीनियर व लोअर एज ग्रुप चॅम्पियनशिप 2026 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंधुदुर्गनगरी येथील लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने थेट राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभाग घेऊन यशस्वीरित्या दोन सिल्वर व एक ब्राँझ मेडल पटकाविले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.लिनांशाने या चिमुकलीने 50 मीटर बटरफ्लाय या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक, 50 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात द्वितीय क्रमांक व इंडिव्हिज्युअल मिडले या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव यशस्वीरित्या या राज्यस्तरीय स्पर्धेत रेखाटले विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दरवर्षी ही स्पर्धा एकदाच होते ज्याला स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया ची मान्यता आहे व या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बरेच स्पर्धक सहभागी होतात पण अपेक्षित यश प्राप्त होत नाहीत मात्र या सगळ्या परिस्थितीवर मात मिळवून पहिल्यांदाच सिंधुदुर्गनगरी येथील लीनांशा हितेश नाईक हिने या स्पर्धेत यश मिळविला आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे गेल्या दोन वर्षाच्या सतत परिश्रमातून हे यश तिने स्वतःच्या कष्टाचा जोरावर संपादन केलेले आहे.लीनाशाच्या जलतरण प्रशिक्षणाच्या सुरुवातीला कालावधीत मध्यंतरी जलतरण तलाव काही महिन्यांसाठी बंद होता नंतर क्रीडा अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी हा जलतरण तलाव कंत्राट पद्धतीने प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांना दिल्यानंतर तो व्यवस्थित सुरू राहिला तसेच या प्रशिक्षकांनी अशा होतकरू जलतरणपटूंसाठी सकाळ संध्याकाळ जलतरण तलाव सरावासाठी नियमित उपलब्ध करून दिला अशा या परिस्थितीतून बाहेर पडत तिने कठोर परिश्रम घेत या स्पर्धेमध्ये यश संपादन केले सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण तलावाचे कंत्राटदार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांच्या मार्गदर्शनाखाली ती दोन वर्षापासून सराव करत होती प्रशिक्षक सुलोकर यांनी लीनांशा नाईक ही भविष्यात लवकरच राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव करेल असा मानस व्यक्त केला आहे प्रशिक्षक कडून तसे तिला मार्गदर्शन देखील सुरू आहे.

error: Content is protected !!