वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा कॉपी प्रकरणात चौकशीची दोन पतके नियुक्त करण्यात आली असून बोर्डाकडूननिवृत्त शिक्षणाधिकारी डी. जी साळुंखे तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रभारी उपशिक्षण अधिकारी संजय माने हेअशी दोन्ही चौकशीपथके आज भुईबावडा केंद्रावर संबंधित शिक्षक आणि विद्यार्थी यांची कसून चौकशी केली यावेळी केंद्रावर असणारे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली परिसराची माहिती घेतली केंद्रावर परीक्षा चालू असताना आत प्रवेश करण्यासाठी चोर वाट आहे का याबाबत पाहणी गेली मात्र चौकशीची पूर्णपणे गोपनीयता पाळली जात असून चौकशी अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि बोर्डाला पाठविण्यात येणार आहे आणि त्या नंतरच बोर्डाकडून संबोधकावर दोषी ठरविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
भुईबावडा केंद्रावर कॉपी प्रकरणा मुळे जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहेत याचे पडसाद तालुक्यातात उमटताना दिसत आहेत आजच्या चौकशीसाठी केंद्रप्रमुख, सुपर व्हिजन आणि विध्यार्थी यांना बोलविण्यात आले होते एका एका ला बोलावून जबाब नोंदविण्यात आले आहेत आजचा चौकशी अहवाल जिल्हा परिषद आणि कोकण बोर्डाकडे दिला जाणार आहेत केंद्रवरील cctv फुडेंज ही घेण्यात आले आहेत












