लांजा (प्रतिनिधी) : पत्रादेवी, गोवा येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने पळणाऱ्या कंटेनरला लांजा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे पकडण्याची घटना आज गुरुवारी दुपारी १२ वागण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच १२ व्हीटी ७०४८ या क्रमांकाच्या कंटेनर ने पत्रादेवी गोवा येथे अपघात करून तो भरदार वेगाने मुंबईच्या दिशेने जात असल्याची खबर गुरुवारी सकाळी ११.४५ वागण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर (मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशन गोवा) यांनी लांजा पोलीस ठाण्याला दिली होती.
तसेच या कंटेनरला पकडण्यासाठी तुमची मदत मिळावी. आमचा पोलीस कर्मचारी पाठीमागून येत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यासंदर्भात आवश्यकता सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेप्रमाणे ११२ चे वाहनाने पोलीस कॉन्स्टेबल आर्डे व चालक पोलीस कॉन्स्टेबल बजागे तसेच ट्राफिक पोलीस भुजबळराव, पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल नाईकवाडे हे शोध घेणे करिता रवाना झाले. यादरम्यान ११२ गाडीतून रवाना झालेले पोलीस कॉन्स्टेबल आर्डे व चालक पोलीस कॉन्स्टेबल बजागे यांना कुवे येथे सदरचा कंटेनर गोवा मुंबई महामार्गाने जात असल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी या कंटेनरचा पाठलाग करून पकडण्यात आला. त्यातील चालक अजीम खान (वय २५, वर्षे राहणार (मोहम्मद शमीन खान यांच्याकडे राहतो) जाम पाखरी चौबे, पोस्ट जमता, साई बस्ती, उत्तर प्रदेश) यास कंटेनरसह लांजा पोलीस ठाण्यात आणले. यानंतर काही वेळातच लांजा पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशन, गोवा पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद पोटे, पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.










