खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे छ.शाहू महाराज जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या प्राथमिक शाळेत लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा १०० स्मृतिदिन कार्यक्रम केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

या कार्यक्रमाला शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ,अर्चना तळगावकर,साहय्यक शिक्षकअलका मोरे,रुपाली पारकर, रेखा लांघी शाळा समितीचे पालक सदस्य अनिल राऊत,सौ पाटील आदी मान्यवर तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज हे बहुजन नायक होते.त्यांनी लोकाभिमुख प्रशासन चालवत गोर – गरीब,शोषित पीडित तसेच वंचित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आणि नोकऱ्या मध्ये आरक्षणाची सवलत देऊन महाण कार्य केले असल्याचे भावपूर्ण ऊदगार शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना काढले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!