कणकवली (प्रतिनिधी) : कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दिपक कांबळे यांची व महासचिव पदी संतोष बनसोडे तर कोषाध्यक्ष पदी आर.डी. चेंदवणकर, कार्याध्यक्ष सुधीर पिलाजी धामणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विस्तारित कमितीमध्ये २१ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेची दि. १४/०६/२०२६ रोजी सायं. ३.०० वा. माध्यमिक शिक्षक पतपेढी ओरोस सिंधुदुर्ग येथे संदिप कदम जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब महासंघ सिंधुदुर्गचे प्रमुख (समाजभूषण महाराष्ट्र शासन) यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली होती. यावेळी 2026 ते 2028 पर्यंत नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. संदिप कदम यांनी महाराष्ट्र शासनाच्या शासन मान्यता असणारी व पाठपुरावा करणारी वेतनवाढ, वेतन आयोग, पदोन्नती, भरती प्रक्रिया, पेन्शन योजना आदि विविध विषयांवर आवाज उठविणारी अशी ही मजबूत संघटना असून प्रत्येक जिल्हा कलेक्टर सोबत विषयवार माहिती व मिटींगचे इतिवृत्त जिल्हा कार्यकारीणीला प्रत्येक महिन्याला सादर करणारी अशी शासन मान्य संघटना असल्याचे मार्गदर्शनात नमूद केले.
आरोग्य विभागाच्या वतीने संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवून आपले पदोन्नती प्रश्न धसास लावणारी संघटना म्हणून संघटनेचा दबदबा निर्माण करण्यात संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कदम है यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या कार्यकालात २३ पदोन्नती संघटनेच्या वतीने यशस्वी पाठपुरावा करण्यात जिल्हाध्यक्ष यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मा. संदिप कदम यांनी नमूद केले. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कुठलाही प्रश्न आपण घेऊन या आपण तो ताबडतोब मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे. अशा या लढाऊ संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष म्हणून दिपक कांबळे यांची सर्वानुमते निवड करून एका जेष्ठ कार्यकर्त्यास संघटनेचे काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दिपक कांबळे यांनी आपल्या २७वर्षांच्या कारकिर्दीत विविध आंदोलने, सभा, मोर्चे अशा विविध मार्गांनी कर्मचारी वर्गाची कामे विविध विषयांवर मांडणी करून सोडविली असल्याचे नमूद केले. एखाद्या कर्मचारी वर्गावर होणारी मारहाण असेल अशा प्रसंगी अधिकाऱ्यांशी दोन हात करून कर्मचाऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडून कर्मचारी वर्गाच्या बाजूने लढा दिलेला आहे. अशा विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे. आपल्या जिल्हा महासचिव पदाच्या काळात कोव्हीड योध्दा म्हणून प्रसंगी भांडून कर्मचारी, आशाताई, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका यांना कोरोना योध्दा म्हणून शासनाच्या वतीने सन्मानपत्र देण्यासाठी महासचिव या नात्याने प्रसंगी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडविल्याचे नमूद केले. शेवटी महासचिव संतोष बनसोडे यांनी उपस्थित संदिप कदम,महेंद्र, कदम,आर. डी. चेंदवणकर, शंकर कदम, नागरे भाऊ (औषध निर्माण अधिकारी), सखाराम गुरखे, महादेव पोखरे, सोनाली संजय तांबे व इतर जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आभार मानून अध्यक्ष संदिप कदम यांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.











