बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची जाहीर; जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर माणगांवकर

चौके (प्रतिनिधी) : बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची मिटिंग बसपाचे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ प्रभारी अनिकेत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ मराठा मंडळ सभागृह येथे मंगळवारी १६ जून रोजी संपन्न झाली.. या बैठकीत ७ जून,२०२६ रोजी स्टेट बैठकीत प्रदेश अध्यक्ष ऍड सुनील डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या संघटनात्मक बांधणी बाबतची माहिती देऊन फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे एकमेव संघटन म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे त्यामुळे कार्यकर्ते यांनी मान्यवर कांशीरामजींचा त्याग समर्पण आणि बहेन मायावतींचे खंबीर नेतृत्व पाठीशी असल्याने प्रामाणिकपणे काम केले तर निश्चितच यशस्वी होऊ असा आत्मविश्वास व्यक्त करत अनिकेत पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष – सुधाकर माणगांवकर, उपाध्यक्ष – पी. के. चौकेकर, महासचिव – दीपक जाधव, कोषाध्यक्ष – इंजि. बाळासाहेब ख्यामनकेरी, जिल्हा सचिव – दुलाजी चौकेकर, जिल्हा सदस्य – आनंद सम्राट, मारुती सोनवडेकर बामसेफ जिल्हा संयोजक म्हणून आनंदकुमार धामापूरकर अशाप्रकारे जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते ठरवण्यात आली. सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी लवकरात लवकर तिन्ही विधानसभा पदाधिकारी नियुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि तन मन धन चळवळीसाठी द्यावे असे आवाहन सुधाकर माणगावकर यांनी केले. बहुजन समाज पार्टी केवळ राजकीय पार्टी नसून विषमता वादी व्यवस्था नष्ट करण्यासाठी समतावादी महापुरुषांच्या विचारांची चळवळ आहे येथे आम्ही सर्व कार्यकर्ते चळवळीचे पाइक म्हणून काम करुया असे मत माजी जिल्हाध्यक्ष पी. के चौकेकर यांनी व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक जिल्हा महासचिव दीपक जाधव यांनी केले तर आभार एस.जी. विणकर यांनी मानले

error: Content is protected !!