तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सांगवे गावची सुकन्या आणि सध्या शिक्षणासाठी आशिये येथे राहणारी कु. स्नेहल संतोष तवटे हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत उज्ज्वल सुयश प्राप्त केले आहे. कु. स्नेहल हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण एस्. एम्. हायस्कूल कणकवली येथे झाले आहे. त्यानंतर पुढील वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचे शिक्षण गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे पूर्ण झाले. हे शिक्षण घेतानाच कु. स्नेहल हिने सीएचाही अभ्यास सुरू ठेवला होता. गुरुवारी जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेच्या निकालात कु. स्नेहल हिने पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश प्राप्त केले. त्याचबरोबर कणकवली काॅलेजमध्ये एम्.काॅम्. पर्यंतचे शिक्षण देखील तिने पूर्ण करून त्यातही ती उत्तीर्ण झाली आहे.
कु. स्नेहल हिचे वडील संतोष तवटे हे आयसीआयसीआय प्रोडशियल लाईफ इन्शुरन्समध्ये सिनियर ॲडव्हायजर म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांचे कणकवली कामत काॅम्प्लेक्समध्ये लाॅग इन एंटरप्रायजेस नावाने कम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिस फर्मचे संचालक आहेत. सध्या ते कणकवली येथे कार्यरत आहेत. तसेच तिची आई देखील याच फर्ममध्ये कार्यरत आहे. स्नेहल ही पहिल्यापासून खूप हुशार आणि अतिशय गुणवान विद्यार्थी होती. कु. स्नेहल हिच्या सीए परीक्षेतील उज्ज्वल यशात तिची कठोर मेहनत, सातत्य होते. त्याचबरोबर आईवडील तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सांगवे सारख्या ग्रामीण भागातून तिने केलेल्या चमकदार कामगिरी बद्दल सांगवे गावांतील ग्रामस्थ, मित्रमंडळी तसेच मैत्री परिवारातील सर्व सदस्यांनी तिचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले आणि तिला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहल तिच्या बद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो:- स्नेहल तवटे









