ओरोस (प्रतिनिधी) : एल.सी.बी सिंधुदुर्ग च्या पथकाने सुकळवाड बाजारपेठ येथील घराच्या बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला 85 हजार 910 रुपयांचा गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा तसेच गावठी हातभट्टी चा दारूसाठा जप्त केला आहे. हेमलता प्रमोद मुसळे, (वय 58, रा. सुकळवाड बाजारपेठ, ता. मालवण), शुभम राठीवडेकर (रा. अणाव, ता. कुडाळ) यांच्याविरोधात दारूबंदी अधिनीयम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस.पी डॉ दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्या सूचनेनुसार एल.सी.बी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 जून रोजी सायंकाळी 7 वाजता ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदानंद राणे, हवालदार राजेंद्र गोसावी, हवालदार बस्त्याव डिसोझा, महिला कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांनी केली असून हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार यांनी सहकार्य केले आहे.
सुकळवाड मध्ये 85 हजारांचा अवैध दारूसाठा एलसीबीकडून जप्त ; हेमलता मुसळे , शुभम राठीवडेकर विरोधात गुन्हा दाखल










