नांदगावमध्ये कल्याण मटका घेणाऱ्यांवर एल.सी.बी ची कारवाई

असलदे सह फोंडाघाट मधील तिघांवर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव मध्ये कल्याण मटका घेणाऱ्या तिघांवर एल.सी.बी सिंधुदुर्ग च्या पथकाने 29 जून रोजी कारवाई केली असून याबाबत असलदे आणि फोंडाघाट मधील तिघांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ सहदेव लोके (रा. असलदे, मधलीवाडी) गणेश गांधी (वय 35, रा. फोंडाघाट), सुमंत कोरगावकर (रा.फोंडाघाट) अशी तिन्ही आरोपींची नावे असून रोखरक्कम 2 हजार 390 व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस.पी डॉ दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्या सूचनेनुसार एल.सी.बी, पी.आय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार गंगावणे, हवालदार तवटे, देसाई यांनी केली.

error: Content is protected !!