स्मशानभूमीचे काम पूर्ण, पण सुविधा अद्याप अपुऱ्या; १५ ऑगस्टला लक्षवेध आंदोलनाचा इशारा

‘सुविधा द्या, अन्यथा आंदोलन’ : सिद्धार्थनगर स्मशानभूमीच्या प्रश्नावर प्रशासनाला इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमी ही अदयायावत व्हावी यासाठी अनेक वर्ष पाठपुरावा करून आज ही स्मशानभूमी अदयायावत झालेली आहे बौद्ध समाजातील बांधवांचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीमध्ये केले जातात गेली अनेक वर्ष या स्मशानभूमी मध्ये दहन करण्यासाठी लाकूड गोडवून शेड ची आवश्यकता होती प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून गोडावून शेड मंजूर झाली व तिचे काम पूर्ण झाले ४ महिन्यांचा काळ लोटला तरी अद्याप पर्यंत या गोडावून मध्ये लाकूड व्यवस्था नाही गेल्या ३/४ महिन्यामध्ये ५ ते ६ जण मयत झालेले आहेत शेड पूर्ण झाल्यानंतर त्यात लाकूडव्यवस्था करणे हे संबंधित प्रशासनाचे काम आहे लाकूड व्यवस्था नसल्याने सार्वजनिक स्मशान भूमी मधून लाकूड व्यवस्था करावी लागते येण्या जाण्याचा वाहतूक खर्च हा गोरगरीब कुटुंबाला परवडणारा नाही गेले अनेक महिने लाईट उपलब्ध नाही रात्री अपरात्री अंत्यसंस्कार करायचे झाल्यावर लाईट नसल्यामुळे करता येत नाहीत बाजूला नदी असल्यामुळे स्मशानशेड खचण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे लाकूड गोडावून शेड बांधून पूर्ण असताना देखील लाकूड व्यवस्था केली नाही तर येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मागासवर्गीय बांधवाना होणाऱ्या या गैरसोईबद्दल लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लक्षवेध आंदोलन कणकवली नगरपंचायत समोर करण्यात येईल.

error: Content is protected !!