कणकवली (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा यांच्या मार्फत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून राज्यस्तरावर सहावा आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर दुसऱ्या इयत्तेत पहिला क्रमांक मिळवून ISRO अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी निवड झालेल्या तिसरी इयत्तें मधील कुमार तनिष आदिती अमोल घाडी या विद्यार्थ्याचा आणि त्याचे आईवडील यांचा वेदांत इमेजिंग सेंटर कणकवली यांच्या मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांची पुस्तके भेट देऊन रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भावी वाटचालीस शुभेछा देण्यात आल्या. यावेळी प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. धनंजय रासम उपस्थित होते. तनिष हा कणकवली विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थी असून त्याच्या यशात त्याच्या शिक्षक वर्गाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शैक्षणिक पाया भक्कम व्हावा, वैज्ञानिक दृष्टीकोन, शोधक वृत्ती यांचा विकास व्हावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते.
ISRO अंतराळ प्रदर्शन भेटीसाठी निवड झालेल्या तनिष आदिती अमोल घाडी याचा डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते सत्कार












