एल.सी.बी ची कारवाई
कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट हवेलीनगर येथे 1 लाख 36 हजार 500 रुपयांची गोवा बनावटीची दारू एल.सी.बी सिंधुदुर्गच्या पथकाने जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवार 16 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता एसपी डॉ दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, यांच्या सूचनेनुसार एल.सी.बी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, हवालदार ज्ञानेश्वर तवटे यांनी केली आहे. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.












