आचरा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा….!

हेड कॉन्स्टेबल तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती…!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती आहे. पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीत परिसरात अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. आचरा गावचे सुपुत्र असलेले आणि पोलीस दलात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत असलेल्या तुकाराम पडवळ यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर ही बढती मिळवली आहे. यापूर्वी सावंतवाडी, कुडाळ, देवगड त्यानंतर मालवण तालुक्यात त्यांनी 35 वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. पोलीस सेवेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या यशामुळे गावकऱ्यांकडून, नातेवाईकांकडून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!