सावंतवाडी डी.वाय.एस.पी पदी राजेश भागवत यांची नियुक्ती…

औदुंबर स्वामी मंदिर समितीच्यावतीने स्वागत; उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारी यांचा सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील डी.वाय.एस.पी पदी राजेश भागवत यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच आपला कार्यभार स्वीकारला या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्याच्या औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीच्यावतीने भुवन नाईक यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान उत्सव समितीच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक काम आणि युवकांचे संघटन कौतुकास्पद आहे असे उपक्रम या ठिकाणी राबविले जावेत जेणेकरून त्याचा फायदा समाजाला होईल असा संदेश यावेळी भागवत यांनी दिला. यावेळी या महिन्याच्या अखेरीस पोलीस खात्यातून निवृत्त होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारी यांचा भागवत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्या ठिकाणी कार्यरत असलेली डी.वाय.एस.पी विनोद कांबळे यांच्या हे नक्कीच सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर गेली काही दिवस डी.वाय.एस.पी पदे रिक्त होते त्या ठिकाणी पुणे येथील कार्यरत असलेल्या भागवत यांना नियुक्ती घेण्यात आली आहे त्यांनी नुकताच आपला कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी उत्सव समितीचे अमोल टेंबकर, हेमंत पांगम, सचिन मोरजकर मृणाल पावसकर, यश गाते, अक्षय माशाळ, प्रशांत सावंत आनंद काष्टे अभय मालवणकर पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र कळंगुटकर हवालदार अजय फोंडेकर रामदास चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!