स्व.अजित पवार जयंती निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरस येथे 22 जुलै ते 1 ऑगस्ट कालावधीत महा आरोग्य सेवा अभियान शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या आदेशानुसार आयोजित जनसेवा साप्ताह अंतर्गत राबविण्यात येणार्‍या महा आरोग्य सेवा अभियान 22 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी महा आरोग्य सेवा अभियान राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये आयोजित करण्यात आले आहे या अभियानातर्फे सर्व सामन्य नागरिकांना डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, जनजागृती, आवश्यक तपासण्या, उपचारासाठी मार्गदर्शन, तसेच शस्त्रक्रिया या सर्व गोष्टी मोफत जनतेसाठी करण्यात येणार आहेत

त्या अनुषंगाने या महा आरोग्य सेवा अभियान शिबिराचे आज दिनांक 22 जुलै रोजी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरस येथे या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार दिपक भाई केसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी स्तब्ध राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले प्रस्तावना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉक्टर अनंत देवांगे यांनी केली

आमदार दीपक केसरकर यांनी संबोधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या स्वर्गीय अजित दादा यांच्या जयंती निमित्त घेण्यात येणार्‍या शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा लोकानी आरोग्य तपासणी करून निदान करावे अजित दादा हे राज्यातील लोकप्रिय नेते होते त्यांचा प्रशासकीय काम करण्याचा फार मोठा अनुभव होता अजित दादा अर्थमंत्री असताना आपण त्या खात्याचे राज्यमंत्री होतो अजित दादांनी विधानपरिषद सभागृहात आपल्याला अर्थसंकल्प सादर करायची संधी दिली होती असे संबोधित करून आमदार दिपक केसरकर यानी अजित दादांना अभिवादन केले भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील,सावळाराम अनावकर गुरुजी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली
या कार्यक्रमाला आमदार दिपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डिन डॉक्टर अनंत देवांगे,सिंधुदुर्ग सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील, राष्ट्रवादी सरचिटणीस सावळाराम अनावकर, भाजप ओरस मंडळ अध्यक्ष भाई सावंत सर्व डॉक्टर्स, नर्सेस, उपस्थित होते

error: Content is protected !!