कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान, डामरे (कानडेवाडी)चे संस्थापक कै. गुरुवर्य सावंत बाबा यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान, डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“करुनी दान रक्ताचे…ऋण फेडू समाजाचे” या समाजहिताच्या संदेशाखाली आयोजित हे रक्तदान शिबिर रविवार, २६ जुलै रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान, डामरे, कानडेवाडी, येथे होणार असून परिसरातील नागरिक, युवक-युवती तसेच नियमित रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी साईनाथ सावंत (९४२०११२८०२), अभिषेक सावंत (९१५८५०७८५०), शशिकांत रांबाडे (७०२०९९४९३५), विनायक पारधिये (९४२०७४१६०९), यश कुबडे (९३७०७२२१२६) आणि अक्षय जाधव (९४०४३९५०६८) यांच्याशी संपर्क साधावा.
या रक्तदान शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान, डामरे-कानडेवाडीचे अध्यक्ष साईनाथ रमेश सावंत तसेच सर्व स्वामी सेवेकरी यांनी केले आहे.












