पदो टकलो झालो रे-एकांकिका व भक्त प्रल्हाद-दशावतारी नाट्यप्रयोग विशेष आकर्षण
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावठणवाडी येथील श्री देव विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा उद्या १६ मे रोजी साजरा होणार आहे.
सकाळी ०९.०० ते १०.०० वा. श्री देव विठ्ठल रुक्मिणी मुर्तीची पाद्यपूजा व अभिषेक, सकाळी १०.०० ते ०१.०० वा. सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. महाप्रसाद, सायं. ०६.०० ते ०८.०० वा. मंडळातील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका- “पदो टकलो झालो रे” रात्रौ ०८.०० ते ९.०० वा. श्री आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ-चिंदर-गावठणवाडी यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ०९.०० वा. अमृतनाथ दशावतारी नाट्यमंडळ, म्हापण ता. वेंगुर्ला यांचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग-“भक्त प्रल्हाद” होणार आहे तरी भाविक भक्तांनी तिर्थप्रसाद, महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा व दशावतारी नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री देव विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती. चिंदर, गावठणवाडी यांनी केले आहे.