युवा नेते प्रताप भोसलेंचा वाढदिवस भरगच्‍च सामाजिक उपक्रमांनी साजरा

कणकवली तालुक्‍यात ठिकठिकाणी तब्बल २६ सामाजिक उपक्रम संपन्‍न

शालेय साहित्‍य, सफाई कामगारांना रेनकोट, रुग्‍णालयांमध्‍ये वैद्‍यकीय साहित्‍य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्‍यात आला. वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्‍यात ठिकठिकाणी शालेय साहित्‍य वाटप, सफाई कामगारांना रेनकोट वाटप, रुग्‍णालयांमध्‍ये वैद्‍यकीय साहित्‍य वाटप असे विविध कार्यक्रम पार पडले. सर्व उपक्रमांमध्‍ये शिवजयंती उत्‍सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उत्‍साहाने सहभागी झाले होते. विशेष म्‍हणजे या उपक्रमांना विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी देखील उपस्‍थिती दर्शविली होती.

युवा नेते प्रताप भोसले यांच्‍या वाढदिवसानिमित्त शिवजयंती उत्‍सव समिती कणकवली शहरतर्फे कणकवलीचे उपनगराध्‍यक्ष सुशांत नाईक यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कणकवलीत विद्यामंदिर हायस्कूलमध्ये वह्यावाटप करण्यात आले. याप्रसंगी अजिंक्‍य लाड, नितेश पवार, सौ. साक्षी लाडक्ष आदी उपस्थित होते. तसेच कणकवली शहरातील विविध प्राथमिक शाळांमध्‍ये नगरसेवक राकेश राणे, नगरसेवक स्‍वप्‍नील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय साहित्‍य वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे व इतर उपस्थित होते.

कलमठ ग्रामपंचायत येथे सफाई कर्मचार्‍यांना पावसाळ्यात उद्भवणारी समस्या लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने रेनकोट वाटप करण्‍यात आले. याच गावातील तीन प्राथमिक शाळांमध्‍ये शैक्षणिक साहित्‍य वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमांना सरपंच तथा भाजप युवा मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष संदीप मेस्‍त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, पं. स. सदस्‍य गुरुनाथ वर्देकर, भाजप अल्‍पसंख्‍यांक सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष निसार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रताप भोसले यांचे सहकारी रुपेश नाडकर्णी, अभिजीत चव्‍हाण, स्‍वरुप कोरगांवकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

वरवडे येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये वैद्यकीय साहित्‍याचे वाटप करण्‍यात आले. यामध्‍ये गोळ्या, औषधांसह अन्‍य साहित्‍यांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव संतोष उर्फ पप्पू पुजारे यांच्या संकल्पनेतून पार पडला. यावेळी स्‍वाभिमान प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष कान्‍हा मालंडकर देखील उपस्थित होते. तसेच वरवडे गावातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेच्या वतीने, शैक्षणिक साहित्य वाटप अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या माध्यमातून झाले.

बिडवाडी, पिसेकामते या गावांतील सर्व प्राथमिक शाळांमध्‍येही शैक्षणिक साहित्‍य वाटप पार पडले. हे उपक्रम शिवजयंती उत्‍सव समितीचे उपाध्यक्ष संजय साळसकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले. जानवली येथेही सरपंच अजित पवार यांच्‍या उपस्‍थितीत शालेय साहित्‍य वाटप करण्‍यात आले. हरकुळ बुद्रुक येथे प्रविण उर्फ बाळा सावंत यांच्‍या उपस्‍थितीत व कोटेश्‍‍वर मित्रमंडळाच्‍या माध्‍यमातून विविध सामाजिक उपक्रम पार पडले.

फोंडाघाट येथे माजी जि. प. सभापती तथा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख संदेश पटेल यांच्या माध्यमातून‌ वाचन व‌ हस्ताक्षर स्पर्धा झाली. या स्पर्धांमध्ये १७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कसवण – तळवडे येथेही बंड्या मालंडकर‌ यांच्या नेतृत्वाखाली तसेच आशिये येथे प्राथमिक शाळांमध्ये रोहीत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

वाढदिवसानिमित्त दिवसभर ठिकठिकाणी पार पडलेल्‍या कार्यक्रमांना कलमठ ग्रा. पं. सदस्‍या जरीना शेख, नितीन पवार, सचिन खोचरे, सागर पवार, प्रणय शिर्के, विठू कोरगांवकर, प्रशांत पुजारे, प्रशांत राणे, नयन दळवी, अचित कदम, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, सोहेल खान, सिझर फर्नांडिस, काका कदम, मंदार मेस्‍त्री, धनंजय सावंत, लतिफ खान, अमोल घाडीगांवकर, सदा चव्‍हाण, शिवदास सादये, रितेश बावकर, सलमान शेख, कुणाल प्रभूदेसाई, अभी देसाई, आयरीस फर्नांडिस, रोहीत ठाकूर, मानतेश देवरमणी, प्रेम सगिलकर, अनुराग चौगुले, रोहन ठाकूर, चंद्रकांत परब, प्रविण सावंत, रामचांद्र सावंत, प्रसाद डोंगरे, नीलेश दळवी, सीताराम सोहनी, जयदीप सोहनी, प्रमोद जुवेकर, अशोक जुवेकर, नूतन सोहनी, वैभव सावंत आदी उपस्‍थित होते.

error: Content is protected !!