सचिन अडसूळ नवे जिल्हा माहिती अधिकारी
ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली झाली आहे. तर सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.
प्रशांत सातपुते यांची रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या मुकुंद चिपवंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. १९ जुलै २०२३ रोजी त्यांनी येथे पदभार स्वीकारला होता. ३ वर्ष ३ दिवसांनी शासनाने त्यांची अहिल्यानगर येथे प्रशासकीय बदली केली आहे. तर त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षात पत्रकारांशी मिळून मिसळून राहत चिलवंत यांनी जिल्ह्यात कारभार पाहिला होता. सहकार्याची भावना त्यांनी नेहमी जपली होती. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेला पत्रकारही त्यांच्या दालनात हक्काने बसत होता.












