कसाल हायस्कूलचे शिक्षक हेमंत झुरे यांना मातृशोक

तळेरे (प्रतिनिधी) : कसाल हायस्कूलचे गणित शिक्षक हेमंत झुरे तसेच जि.प. प्राथ.पाटथर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती झुरे -ढेरे यांच्या मातोश्री सौ.शालन कृष्णकांत झुरे वय-६८ यांचे शुक्रवारी ३१ जूलै रोजी बलवडी ता.सांगोला जि.सोलापूर येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

कुणकेश्वर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे व नाधवडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता आलदर- झुरे यांच्या त्या सासुबाई होत.त्यांच्या पश्चात पती,दोन विवाहित मुलगे,दोन विवाहित मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्याचं निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!