इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण टाकेवाडी जि.प. प्राथमिक शाळेचा १०० टक्के निकाल

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण संभाजी नगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टाकेवाडी या शाळेचा इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी ३ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.तर १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

इयत्ता ४ पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन – २०२६ मध्ये या शाळेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी पुढील प्रमाणे – कु.प्रेक्षा राजेंद्र तेरवणकर (२१६ गुण),कु.वैष्णवी महेंद्र गुरव (१७२ गुण),कु.स्वरा राजेंद्र चिके (१५२ गुण) तसेच या शाळेत घेण्यात आलेल्या डॉ.ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाला देखील १०० टक्के लागला असून यामध्ये कु.प्रेक्षा राजेंद्र तेरवणकर (२१८ गुण), कु. वैष्णवी महेंद्र गुरव (२१० गुण), कु.स्वरा राजेंद्र चिके (१४० गुण) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे शिक्षक राजेश तेरावणकर व प्रिया झगडे यांचे जि.प.सदस्या प्राची ईसवलकर, पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव टाकेवाडी जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मानसी गुरव, उपाध्यक्ष निखिल गुरव तसेच समिती सदस्य व ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.

1कु.प्रेक्षा राजेंद्र तेरवणकर 2 कु.वैष्णवी महेंद्र गुरव 3 कु.स्वरा राजेंद्र चिके

error: Content is protected !!