गुरुपौर्णिमेनिमित्त शेठ न. म. विद्यालयात ‘स्वरपौर्णिमा’ वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शेठ न. म. विद्यालय,खारेपाटण येथे ‘स्वरपौर्णिमा’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. ज्ञान, संस्कार आणि कलेची परंपरा जपणाऱ्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यावेळी सुंदर व्यासपीठ मिळाले. विद्यालयाचे संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन व उत्कृष्ट सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गायन, सुरेल वादन तसेच आकर्षक नृत्य सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. विविध कलाविष्कारांनी सजलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यालयाचा परिसर सुरेल स्वरांनी आणि उत्साहाने भारून गेला होता. विद्यार्थ्यांच्या या कलात्मक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत त्यांचे कौतुक केले. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणारा ‘स्वरपौर्णिमा’ हा कार्यक्रम खारेपाटण हायस्कूल मध्ये संस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमास खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर विश्वस्त विजय देसाई,विद्यालयाचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत ज्येष्ठ शिक्षक राजेश वारंगे दयानंद कोकाटे, सुनील जाधव यांच्यासह शिक्षकवृंद,विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल उपस्थितांनी संगीत शिक्षक, संगीत विभागातील विद्यार्थी आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खारेपाटण हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेचा विद्यार्थ्यांनी शालेय आवारात वृक्षारोपण केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, पंचायत समिती कणकवलीचे विषय तज्ञ सचिन तांबे, राष्ट्रीय हरित सेना शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण व राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!