बांदा (प्रतिनिधी) : शेर्ले कापईवाडी येथील सावळाराम सुदन धुरी याला कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी चाकाची खुर्ची (व्हील चेअर) प्रदान केली.सावळाराम हा दिव्यांग आहे.त्याला चाकाच्या खुर्चीशिवाय हालचाल करता येत नाही. तो वयाने वाढल्याने आता त्याला उचलून नेणे त्याची आई संज्योता यांना जमत नाही.त्यांची ही अडचण लक्षात घेऊन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सावळारामसाठी चाकाची खुर्ची प्रदान केली.यावेळी त्यांच्यासोबत माटणे मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस,तालुका उपाध्यक्ष आनंद तळणकर,स्वीकृत नगरसेवक तथा दोडामार्ग शक्ती केंद्र प्रमुख समीर रेडकर,पोलिस मित्र पिकी कवठणकर , संज्योता धुरी,प्रकाश धुरी आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल धुरी परिवाराकडून दात्यांचे आभार मानण्यात आले.
नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडून चाकाची खुर्ची प्रदान












