पी आय राजेंद्र मगदूम यांनी स्वीकारला सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पदभार

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले स्वागत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपला पदभार स्वीकारला. येथून बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी त्यांच्याकडे कार्यभार दिला तर डीवायएसपी राजेश भागवत हे रजेवर असल्यामुळे श्री. चव्हाण यांच्याकडे दोन दिवस डीवायएसपी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांकडून दोघांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, माधुरी मुळीक, प्रमोद पाटील, अमित राऊळ, मनोज राऊत आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!