श्री देव लिंगेश्वर मंदिर काळसे वर्धापनदिन २० मे रोजी

धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : काळसे येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर च्या ९ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे.

त्यानिमित्त सकाळी ८ वाजता रुद्राभिषेक , सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता आरती , दुपारी १ ते ३ महाप्रसाद , सायंकाळी ५ : ३० वाजता सुश्राव्य भजने आणि रात्रौ ७ : ३० वाजता बुवा विनोद चव्हाण विरूध्द बुवा सुशिल गोठणकर यांच्यामध्ये २०x२० डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व श्री देव लिंगेश्वर भाविक भक्त आणि भजन रसिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ , श्री देव लिंगेश्वर देवालय ट्रस्ट काळसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!