कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेश परुळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे वकील संघटनेत तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कणकवली तालुका वकील संघटनेच्या दिनांक 3/8/2026 रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2026 ते 2026 या तीन वर्षाच्या कालावधीकरिता अध्यक्ष ॲड. राजेश परुळेकर, उपाध्यक्ष ॲड. रेखा सावंत, सेक्रेटरी ॲड. मिलिंद सावंत, खजिनदार ॲड. तुषार परब, सदस्य ॲड. प्रकाश पावसकर, ॲड. श्वेता रजपूत, ॲड. गौतमी गावकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष ॲड. अनिल बर्वे आणि त्यांच्या कार्यकारिणीने संघटनेचे व्यवस्थापन नूतन कार्यकारिणीकडे सोपविले. संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जेष्ठ वकील विद्याधर चिंदरकर, ॲड. बी.एम. दळवी, ॲड. उमेश सावंत, ॲड. विलास परब, ॲड. संदीप राणे, माजी अध्यक्ष ॲड. अनिल बर्वे, माजी उपाध्यक्ष ॲड. प्राजक्ता शिंदे, माजी सचिव ॲड. स्वप्निल सावंत, खजिनदार ॲड. प्रतिमा सातवसे, सदस्य ॲड. राधिका मुंज. ॲड. संदीप वंजारे, ॲड. प्रकाश पावसकर, ॲड. मनोज रावराणे, ॲड. निकिता म्हापणकर, ॲड. मेघना सावंत, ॲड. मनाली वंजारे व इतर बहुसंख्य सदस्य हजर होते.
ॲड. राजेश परुळेकर यांनी अनेक वर्षे वकिली व्यवसायात प्रामाणिकपणे काम करताना न्यायव्यवस्थेप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. बारमधील सर्व वकिलांना विश्वासात घेऊन संघटनेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे. वकिलांच्या व्यावसायिक अडचणी सोडविणे, न्यायालयीन सुविधांमध्ये सुधारणा करणे, नवोदित वकिलांना मार्गदर्शन करणे तसेच बारमधील एकोप्याला अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल कणकवली तालुक्यातील वकील, विविध सामाजिक संस्था, मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकाळात कणकवली बार कौन्सिल अधिक सक्षम आणि प्रगतिशील वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.












