कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रवासी संघाचे तात्कालीन अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाशी समन्वय साधून प्रवाशांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. ख-या अर्थाने मनोहर पालयेकर यांनी प्रवासी संघाचे उभं केलेलं काम अविरत ठेवलं जाईल, असे नुतन अध्यक्ष सखाराम सपकाळ यांनी सांगितले.
कणकवली नगरपंचायत येथील विरंगुळा केंद्रात कणकवली तालुका प्रवासी संघाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला प्रवासी संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव सुभाष राणे, विलास चव्हाण ,श्रद्धा कदम ,श्रीमती जाधव ,भालचंद्र मराठे, अमोल भोगले यांच्या सह प्रवासी संघाचे सभासद उपस्थित होते. यावेळी प्रवासी संघाच्यावतीने नुतन अध्यक्ष सखाराम सपकाळ यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!