वीजचोरी प्रकरणी कणकवलीत मयूर खुटाळे वर गुन्हा दाखल

विना मीटर घरात सुरू होता वीजवापर

कणकवली (प्रतिनिधी): थकबाकीमुळे महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही वीज खांबावरून वीजचोरी केल्याप्रकरणी मयुर विजय खुटाळे (रा. ढालकाठी- कणकवली) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ मे रोजी उघडकीस आली. याबाबत महावितरणच्या कणकवली कार्यालयाचे उपअभियंता सागर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने कणकवली शहरातीत वीजपुरवठा खंडित असलेल्या प्रमुख दहा ग्राहकांची यादी पडताळणी करण्यासाठी कांबळे यांच्याकडे दिली होती. याबाबत तब्बल १ लाख ९० हजार रुपये थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक धोड़ कृष्णा सुराळे (रा. ढालकाठी- कणकवली यांचे घर कांबळे यांनी तपासले असता घरामध्ये वीजपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाहणी केली असता, असे आढळले की, खुटाळे यांच्या राहत्या घराच्या पाठीमागीत खांबावरून विनामीटर टॅप करून अनधिकृतपणे वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. मिळून ३ दरम्यान, कांबळे यांनी घराची पाहणी केली असता घरातील एलईडी बल्ब, पंखे, टीव्ही, फ्रिज, एसी, पाण्याची मोटर आदी हजार वॅटचा विदयुतभार वापर आढळून आता. ही वास्तू धोंडू खुटाळे यांची असून त्यांचा नातू मयुर विजय सुटाळे हा वास्तूमधीत उपकरणांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले

error: Content is protected !!