शेकडो भाविकांनी लावली हजेरी
चौके (प्रतिनिधी) : धामापूर सडा येथील श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे श्री देव मोरेश्वर मित्रमंडळाच्या वतीने माघी श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात साठी शेकडो भाविकांनी हजेरी लावत जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव मोरेश्वराचे दर्शन घेतले.
यानिमित्त सकाळी श्री मोरेश्वर अभिषेक , गणपती आरती , महाप्रसाद , सरपंच सौ मानसी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी हळदीकुंकु , सायंकाळी स्थानिकांची भजने तसेच मान्यवरांचे सत्कार आणि त्यानंतर हेळेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग असे कार्यक्रम झाले. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्री. मोरेश्वर मित्रमंडळ धामापूर चे कार्यकर्ते, धामापूर ग्रामस्थ आणि भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.













