कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली, तेलीआळी येथील रहिवासी सुरेश उर्फ आबा गोविंद वालावलकर (वय ७४) यांचे मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार विवाहित मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुदर्शन मित्रमंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. सेवानिवृत्त बँक कर्मचारी भाई वालावलकर यांचे ते बंधू होत.
सुरेश उर्फ आबा वालावलकर यांचे निधन











