मसुरे मार्गाचीतड येथे माघी गणेश जयंती उत्साहात संपन्न !

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिर येथे श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने “माघी श्री गणेश जयंती” उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांची दर्शन रांग थेट देवलयाबाहेर आली होती. यानिमित्त सकाळी श्री महागणपती पूजा व अभिषेक, सहस्त्रावर्तन, श्री. सत्यनारायण महापूजा, सकाळी महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद,
हळदीकुंकू समारंभ, सायं देवश्री संगीत क्लासेस शाखा मसुरे बुवा श्री. सागर राठवड यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ
अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, म्हापण, वेंगुर्ले यांचा पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग ‘मयुर जन्म’ आदी कार्यक्रम झाले. या उत्सव यशस्वीतेसाठी श्री महागणपती विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!