देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पडेल गावातील पारवाडी स्मशानभूमीच्या चिरेबंदी रस्त्याचे भूमिपूजन स्थानिक ग्रामस्थ सुहास बोडस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सरपंच भूषण पोकळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या रस्त्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 50 हजार निधी खर्च करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात या स्मशानभूमीत शेड निवारा दीड लाख निधी खर्च करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रा.पं.सदस्य प्रभाकर वाडेकर,समीर हेमले,सिद्धेश्वर पाटणकर,सदस्य दशरथ ठुकरूल, ग्रा.प.सदस्या अदिती तानवडे, सानिका तानवडे,शरयू अनुभवणे,सायली वारीक,शिक्षक महांबरे, संतोष मोंडे, बबन मोंडे,बाळा मोंडे,प्रकाश पुजारे व इतर ग्रामस्थ होते.
🙏🙏