31 मे रोजी इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सकाळी 11 वाजता घेणार आढावा बैठक
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे 31 मे रोजी सकाळी 11 वाजता इंद्रप्रस्थ हॉलमध्ये देवगड तालुक्यातील जलजीवन मिशन कामाचा आढावा घेणार आहेत.जलजीवन मिशन मुळे प्रत्येक नागरिकाला पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.मात्र जलजीवन मिशन च्या कामात त्रुटी असल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. त्यामुळे जनतेची गैरसोय दूर होऊन योग्य पद्धतीने जलजीवन मिशन चे काम व्हावे यासाठी आमदार नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी तालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेणार आहेत.31 मे रोजीच्या बैठकीला देवगड तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून आपल्या अडचणींचे निरासन करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.