श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघाची सविता आश्रम ला आर्थिक मदत

कणकवली(प्रतिनिधी) : व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी कृतीतून जपणे हे फार महत्वाचे आहे.कणकवली शहरातील श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघाने ही सामाजिक बांधिलकी जपत पणदूर येथील सविता आश्रमाला पदरमोड करत रोख 5 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली.त्यासोबत आश्रमातील आश्रितांसाठी कपडे तसेच नाष्टाही दिला. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी टेम्पो संघाच्या सदस्यांनी ही रक्कम सविता आश्रम च्या विश्वस्तांकडे सुपूर्त केली.यावेळी श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघाचे उदय सावंत, मारुती वरवडेकर,चिंतामणी तिरोडकर, उत्तम ताम्हाणेकर, संदेश मेस्त्री, प्रसाद डोंगरे, पन्हाळकर,अमित फोंडेकर,संजय कांबळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!